जाणून घ्या, एक चांगला हिंदू कार्यकर्ता कसे बनाल?


जे काही मी एक हिंदू कार्यकर्ता म्हणून शिकले आहे, ते मी
इतरांच्या फायद्यासाठी सांगत आहे. मला विश्वास आहे की काही लोक यापेक्षा चांगले सांगू शकतात, पण मी सर्वांत पहिल्यांदा हे लिहून एका मालिकेचा श्रीगणेश करत आहे, जेणेकरून लक्षावधी हिंदू कार्यकर्त्यांना फायदा होईल आणि ते माझ्या व इतरांच्या अनुभवातून शिकू शकतील आणि त्यांच्याकडून धडा घेऊन ते मी व इतरांनी केलेल्या चुका परत करत करणार नाहीत. यामुळे ते अधिकाधिक कार्य नेमकेपण्याने करू शकतील आणि थोड्या वेळेत अधिक यशस्वीरित्या करू शकतील.
१. आपले उत्पन्नाचे स्त्रोत उदा. नोकरी, व्यापार वगैरे चालू ठेवा, त्यांना नष्ट करू नका.
हिंदू सामाजिक विषयांवर कार्य करत असतांना काही तरुण आपल्या धंद्याला थांबवून टाकतात. काहीतर नोकरी सोडून देतात, जे नितांत चुकीचे आहे. काहींना वाटते की, यामुळे ते अधिक वेळ देऊ शकतील, पण याचे पूर्णपणें उलट घडते. माझे रोजगार बंद करण्याची चूक मीही केली आती आणि मला त्याचे भुर्दंड भरावे लागले होते. तुमचे उत्पन्न हीच तुमची प्रमुख शक्ती आहे आणि त्याला नष्ट करून तुम्ही स्वताला नष्ट करत आहात. तुम्ही स्वतः नष्ट झाल्यावर सामाजिक कार्य कसे करू शकाल? याने तुमचे कुटुंबही कष्टावून जाईल आणि तुम्हीही. म्हणून स्वतःचा धंदा आणि उत्पन्न अविरत चालू ठेवा, जेणेकरून तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. भले तुमचे सामाजिक कार्य थोडे कमी होईल, पण जेवढे होईल तेवढे पुरेपूर आणि सातत्याने होईल. याने तुमच्या कुटुंबाचे समतोलही साधले जाईल आणि नात्यांमध्ये ओलावाही टिकून राहील. लक्षात ठेवा, की तुमचा धंदा बंद पडल्यास तुम्ही तुमची बायकामुले आणि आई वडिलांचे गुन्हेगार ठराल आणि तुम्ही कधीही यश संपादन करू शकणार नाही. समाजाला वाचवणे म्हणजे सगळ्या कुटुंबांना वाचवणेंही आहे, म्हणून आपल्या कुटुंबाला सबळ असे ठेवा.
२. आपल्या कार्याविषयी वाचन करत रहा, संबंधित तज्ञांच्या संपर्कात रहा.
आपल्याला आपल्या हिंदू सामाजिक कार्याची सखोल माहिती असली पाहिजे, आपण त्यासंबंधी पुस्तके व लेख वाचत राहिले पाहिजेत, तेव्हाच आम्ही नेमके काही कार्य करू शकू.उदा. लव्ह जिहादविरुद्ध कार्य करतांना लव्ह जिहादसाठी कोणत्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. उदा. मुस्लिम तरुण नटूनथटून मुलींच्या शाळांबाहेर फिरतात, स्वतःला उदारमतवादी असे भासवण्यासाठी हातात रक्षा बांधतात आणि हिंदू नावेही ठेवून घेतात. काहीतर हिंदु धर्माची थोडी माहितीही घेतात. तुम्हाला हे ही माहीत असायला हवे की, लव्ह जिहाद द्वारे हिंदू मुलींची काय गत झाली आहे.अशी अनेक उदाहरणे तुमच्याकडे पुराव्यासह असायला हवीत. इस्लाममधील स्त्रियांच्या स्थितीबद्दलही माहिती असायला हवी. स्त्रियांवर मौलानांचे फतवे उदा. इस्लाममध्ये स्त्री-पुरुष सारखे किंवा समान नाहीत इत्यादी तुम्हाला माहीत असावेत. याद्वारे तुम्ही तुमच्या विषयावर परिणामकारक कारवाई करू शकाल.
३. गरजेप्रमाणें ग्रंथालय बनवा, विषयाशी निगडीत बातम्यांची माहिती ठेवा.
आपल्या विषयाशी निगडीत पुस्तके आणि लेखांचे एक वैय्यक्तीक संग्रह ठेवा आणि त्याच्यामध्ये भर घालत रहा. विषयाच्या तंज्ञांच्या संपर्कात रहा आणि अपडेटही घेत रहा. अशी माहितीच तुम्हाला सफळ बनवेल.
रोज काही नवीन घडत राहते उदा. राष्ट्रीय पातळीची खेळाडू लव्ह जिहादला बळी पडली. म्हणून संबंधित नवीनतम बातम्यांची माहिती ठेवा आणि हानी पोचवू शकत असलेल्या नवीन क्लृप्त्या आणि वर्तमान स्थितीला समजण्यासाठी या बातम्यांकडून शिकत रहा. सबळ बातम्यांमुळे तुमचे संदेशही दूरगामी बनते.
४. आपल्या कार्याशी निगडीत बैठका करा, सोशल मिडियाच्या वापर करा.
समाजात जागृती आणण्यासाठी आणि स्वतासाठी जनाधार उभा करण्यासाठी विषयाला धरून बैठका घ्या. बैठकीत आलेल्या काही व्यक्ती तुमच्या संघटनेशी जोडल्या जातील. बैठक कमीतकमी खर्चात घेतली गेली पाहिजे. बैठकीसाठी निधी तुम्ही स्वतः व आंशिकरीत्या संघटनेच्या मदतीने उभा करा. तुम्ही तुमच्या विषयावर लहानसहान पुस्तके लिहिलेली असल्यास, बैठकीत आलेल्या लोकांना त्या विकत घेण्यास सांगा. याने तुमचा खर्चही भागला जाईल.पैशासाठी आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांशी आपल्या विषयाची चर्चा करा. त्यातील काही व्यक्ती तुम्हाला सामाजिक कार्यासाठी आर्थिक साहाय्यही करतील.
याबरोबरच आजच्या विनामूल्य आणि अत्यंत प्रभावी अशा सामाजिक माध्यमांचा उदा. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबचा वापर करा. यांवर आपल्या विषयाच्या माहितीला पसरवा.आपल्या विषयावर बनवलेले छोटे व्हिडियो(चलचित्र) अत्यंत प्रभावी असतात, म्हणून मोबाइल कॅमर्याने बनवूनच हे व्हिडिओ अशा माध्यमांवर टाका.
५. आपले विषय, कार्य आणि समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी लेख लिहा.
आपल्या कार्यात जसजसे तुम्ही पुढे जाल, आपला अभ्यास वाढवा आणि त्यावर लेखही लिहा. हे लेख विभिन्न उपलब्ध संकेतस्थळ उदा. Hinduabhiyan.com, hindutva.info आणि revoltpress.com इत्यादींवर प्रकाशित होऊ शकतात. यामुळे तुम्ही कमी वेळेत, कमी प्रयत्नांने देशाच्या हिंदू समाजाला जागॄत करू शकाल आणि समस्यांच्या जमेल तेवढे निवारणही करू शकाल. या लेखांमुळे संपूर्ण भारतात तुमची ओळख वाढण्यासही मदत होईल.
६. तुमच्या विषयाच्या विरोधात कार्य करणार्या संघटनांच्या हालचालींची माहिती ठेवा.
हिंदू सामाजिक विषयांच्या विरोधात कार्य करणारी अनेक लोक आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या हालचालींची माहिती ठेवा. याने तुम्ही तुमची रणनीती बनवू शकाल. सगळेच मार्क्सवादी हिंदूविरोधी कारवायांत आकंठ बुडालेले आहेत. ख्रिस्ती मिशनरीसुद्धा हिंदू धर्माची निंदानालस्ती करणारे साहित्य लिहत असतात. म्हणून आपण यांच्या हालचालींची माहिती ठेवायला हवी आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करणार्या लोकांपर्यंत माहिती पोचवायला हवी.
७. वेगवेगळ्या हिंदू संघटनांशी संपर्क बनवा आणि वाढवा.
आपले विषय आणि अन्य विषयांवर अन्य संस्थाही काम करत आहेत. म्हणून अधिकाधिक संघटनांशी संबंध बनवा. त्यांच्यात उणिवा शोधत बसू नका. होताहोईल, तेवढे समन्वय साधा.
८. कमीत कमी कायदेशीर ज्ञान ठेवा, वकील इत्यादींशीही संपर्क ठेवा.
तुम्हाला कार्य करत असतांना अशा परिस्थितींना सामोरे जावे लागेल, जेव्हा तुम्हाला कायदेशीर साहाय्याची गरज पडेल. म्हणून आधीपासूनच वकील आणि मीडियाच्या काही लोकांशी संबंध बनवून ठेवा, जे वेळ पडल्यावर तुम्हाला साहाय्य करतील.
९. कुटुंबाला वेळ द्या.
आधीच सांगितल्याप्रमाणें, आपला धंदा नियमीत ठेवा आणि कौटुंबिक खर्चांची पूर्तता करा. याचप्रमाणें, कौटुंबिक नाते उदा. बायकामुले आणि आईवडिलांनी वेळ द्या. बायकामुलांच्या गरजा आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष देणें तुमचे कर्त्तव्य आहे, म्हणून त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या. कदाचित तुमच्या बायकोला हिंदु समाजासाठी तुम्ही करत असलेले कार्य आवडत नसेल, तर तिच्यासमोर त्याची चर्चा करू नका, पण तिच्याकडे पूर्ण लक्ष द्या.
१०. स्वताचे वेदसंमत आध्यात्मिक गुरू करा. उपास्यदेवतेचे नामजप करा.
शेवटी तुम्ही स्मरण ठेवायला हवे की तुम्ही हिंदू धर्माचे कार्य करत आहात म्हणून तुम्हाला धर्माचेही ज्ञान हवे. हिंदु धर्माचे मूळ ईश्वरीय वेद आहेत. जेकाही नियम आहेत, ते वेदसंमत आहेत. वेदाच्या बाहेर असलेले धर्म नव्हे. म्हणून तुम्हीही वेदसंमत आध्यात्मिक गुरुंचे शिष्य बना. अशा गुरूंना वेदांचे संपूर्ण ज्ञान हवे.कर्मकांड सांगणारे उदा. पुष्प अर्पित करा, नारळ वाढा असे म्हणणारे गुरू नव्हेत. गुरु जीवनात मोक्ष मिळवण्याचे मार्ग दाखवतात, जे वेदांद्वारेच शक्य आहे. म्हणून तुमच्या उपास्यदेवतेचे नामजप करा. कलीयुगात नामजपाने उपास्यदेवतेचे गुण तुमच्यात येतात, म्हणून जेवढा शक्य असेल तेवढे  नामजप अवश्य करा.
११. मीडियामध्ये संपर्क बनवा. मीडियाशी न भांडता समन्वय साधा.
आज वृत्तपत्र, न्यूझ पोर्टल आणि वृत्तवाहिन्यांना काळानुसार खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून यांच्याशी संपर्क बनवा. लक्षात ठेवा, यांच्याशी भांडत बसू नका, उलट त्यांच्याशी समन्वय साधा.मीडियाचे काम तुम्हाला सफळ बनवणें नसून तुमच्या कार्याची माहिती त्यांच्या व्यासपिठामार्फत देणें असे आहे. यांच्याशी एवढीच आशा ठेवा आणि गोड संबंध असू द्या.
१२. यंत्रवत न होता थोडे मनोरंजनही करावे.
आम्ही यंत्रे नसून मानव आहोत, आणि आम्हाला आमचे असे मानसशास्त्र आहे. आम्ही ही तणाव आणि अडचणीत सापडतो. म्हणून थोडी करमणूकही करा. आजकाल यूट्यूब सारखे माध्यम आहेत, ज्यांच्यावर हास्यकथा आणि कवितेच्या अनेक व्हिडिओ सापडतील. टी.व्ही. पाहणें शक्य नसल्यास यूट्यूबने करमणूक करा. आवडीची गाणे ऐका. यंत्र बनू नका, नाहीतर तुम्ही उद्देशापासून भरकटले जाल.उद्दिष्टाकडे लक्ष केंद्रित ठेवा, पण सोबत मन आणि शरिराचेही समतोल राखा.
माझ्या अनुभवांनी अनेक लोकांना आपल्या चुकीची जाणीव झाली असेल आणि त्यामध्ये ते सुधारणा करतील, असे मला वाटते. मला हेही वाटते की माझ्यापेक्षा अधिक अनुभवी हिंदू कार्यकर्ता या विचारांमध्ये आपले विचारही जोडतील आणि मला व अनेकांना त्यापासून शिकायला मिळेल. मी इतर हिंदू कार्यकर्तांना विनंती करतो की, त्यांनी इतरांच्या फायद्यासाठी आपले अनुभव व्यक्त करावेत.

Translation Responsibility by Shri Nityanand Bhadra


Comments